बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिव्यातील आठवडी बाजारचां रिक्षाचालक व नागरिकांच्या जीवाशी खेळ…..

अमित जाधव - संपादक

ठाणे -दिवा शहरात दर शनिवारी ,बुधवारी,मंगळवारी आठवडाबाजार भर रस्त्यावर सुरू असतो. यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडू याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत तर आठवडी बाजारातील विक्रेत्यास विचारणा केल्यास आम्ही प्रत्येकी वीस रुपये महापालिकेच्या लोकांना देत असून जागेचे देखील १०० ते ५० रू प्रत्येकी भरतो असे सागितले.

दातिवलि नाक्या जवळील रस्त्यावर अनेक वर्षांपासून दर शनिवारी सायंकाळी आठवडा बाजार भरतो. शहरी भागात भरणारे आठवडा बाजार भाजीखरेदीसाठी सुरू करण्यात आले होते. मात्र या बाजारात परप्रांतीय विक्रेते भाजी, खाद्यपदार्थ सोडून वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी ठेवतात. ग्लोबल शाळेजवळील फूटपाथ आणि रस्ता या बाजारामुळे व्यापून जातो.स्थानिक प्रशासनाला या बाजाराला वेळीच आवर घालण्यात अपयश आल्याने आता ही जबाबदारी महापालिकेवर आली आहे. सायंकाळी ४ वाजता सुरू होणारा हा बाजार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. यामुळे या रस्त्यावरून चालणे कठीण होते. बाजारात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन चोरीचे प्रकारदेखील घडतात. यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना आहे. मंगळसूत्र चोरी, पाकीटचोरी असे प्रकार अनेक वेळा या बाजारात घडले आहेत. या रस्त्यावर असलेल्या सोसायट्यांमधून बाहेर पडणेदेखील कठीण होते. लहान मुलांचे तर खूप हाल होतात. रस्त्याच्या मध्येच बाजार भरत असून रिक्षा चालक देखील मेटाकुटीला आले आहे एखाद्या अपघात झाला की मग राजकीय पक्ष,समाजसेवक, हे रिक्षा चालक मालक संघटनेच्या नावाने बोंब मारतात व रिक्षा चालकांनवर कारवाई मोठे नुकसान सोचावे लागते. महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर नावापुरती कारवाई केली जाते. मात्र या आठवडी बाजारावर कायमस्वरूपी तोडगा काढता आलेला नाही. महापालिका अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. मात्र महापालिकेने याची गंभीर दखल घेतलेली नाही. नागरिकांची गैरसोय करणाऱ्या या बाजारावर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे