आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंग
दिव्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या कल्याण ग्रामीण संघटिका योगिता नाईक यांच्या पुढाकाराणे भव्य आरोग्य शिबीर संपन्न…
अमित जाधव - संपादक

0
2
0
9
7
4
दिवा:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने, बेडेकर नगर शाखेत कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका सौ. योगिता हेमंत नाईक यांच्या पुढाकाराने व बेडेकरनगर शाखाप्रमुख शशिकांत कदम यांच्या देखरेखीखाली आज भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिवा परिसरातील वाढत्या आजारपणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य आरोग्यसेवा, आश्वासन आणि मानसिक धीर मिळावा या उद्देशाने हे शिबीर घेण्यात आले.या आरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळपासून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून तपासणी करून घेतली. वरिष्ठ डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रमपूर्वक सेवा दिली.
शिबिराच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांचे एक अजरामर वाक्य प्रभावीपणे प्रकर्षाने अधोरेखित झाले
या उपक्रमासाठी शाखाप्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक आणि वैद्यकीय टीम यांचे योगदान मोलाचे ठरले.दिवा परिसरातील जनतेला आरोग्यदृष्ट्या सुरक्षित, जागृत आणि आत्मविश्वासपूर्ण करण्याच्या ध्येयाने अशा उपक्रमांची मालिका पुढेही राबवली जाईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.
यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲड.रोहिदास मुंडे शहर प्रमुख सचिन पाटील,शहर अधिकारी अभिषेक ठाकूर,सुयोग राणे,विभागप्रमुख हेमंत नाईक,उपविभागप्रमुख अजित माने,शाखाप्रमुख समाधान कदम,नरेश दुडा, दत्ता भोसले,सुमित अगले,कृष्णा जाधव गजानन शेलार उपशाख प्रशांत गुडेकर,शंकर राणे,महेश मुलम,सुभाष चव्हाणऋषिकेश परब,गटप्रमुख व महिला आघाडी
आदी उपस्तित होते.
0
2
0
9
7
4



