बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिवा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, विकास म्हात्रे गेट मधील महिलांची छेडछाड करणाऱ्या आरोपीस 48 तासात अटक……

अमित जाधव-संपादक

दिवा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, विकास म्हात्रे गेट मधील महिलांची छेडछाड करणाऱ्या आरोपीस 48 तासात अटक……

दिवा विकास म्हात्रे गेट मधील महिलांची छेडछाड करणाऱ्या नराधम आरोपी आकाश पवार याने 11 वर्षाच्या नाबालिग (रिता) नामक मुली सोबत दोन ते तीन दिवस पाठलाग करत तिच्या इमारती जवळ जाऊन अशील चाळे व अतिप्रसंग करत होता या प्रसंगी पीडित परिवाराने दिवा पोलीस चौकीत तक्रार दाखल केली असता कळताच सदर आरोपी घरातून फरार झाला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दिवा पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक मा.शहाजी शेळके यांनी दखल घेत आरोपीस ४८ तासात जेरबंद केले.
१८ तारखेला पीडितेच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली सदर होती दिवा पोलिसांनी सूत्रे फिरवत आरोपीस 48 तासात अटक करून कोर्टात हजर केले असता 25 जून प्रयन्त आरोपीस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे व घटनेचा पुढील तपास मा.शेळके व सहकारी करत आहेत असे मुब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलीस चौकीतुन कळविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे