दिव्यात २१ सप्टेंबरला रंगणार भव्य राजस्तरीय मंगळागौर स्पर्धा….,आयोजक उपशहर प्रमुख शैलेश मनोहर पाटील…
अमित जाधव - संपादक
ठाणे ता १६ सप्टें : शिवसेना दिवा शहर पुरस्कृत नवदुर्गा मंगळागौर ग्रुप आयोजित वसा परंपरेचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा या ब्रीद वाक्यानुसार राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धा यंदा दिव्यात 21 संप्टेंबर रोजी जिव्हाळा हॉल येथे संपन्न होणार आहे. यासाठी प्रथम पारितोषिक 21 हजार व आकर्षक सन्मानचिन्ह तसेचे द्वितीय 15 हजार व तृतिय १० हजार रोख व सन्मानचिन्ह तसेच उतेजनार्थ पाच पारितोषिके असून खास आकर्षण म्हणून दिव्यातील महिलांसाठी लकी ड्रॉ २५ पैठणी साडी ठेवण्यात आल्या आहेत या उपक्रमात दिव्यातील असंख्य महिला वर्गाने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक शैलेश मनोहर पाटील यांनी केले आहे.
दिवा शहरातील महिलासाठी मा. नगरसेवक व शिवसेनेचे उपशहर प्रमुख शैलेश पाटील हे नेहमीच महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत असतात. त्यांच्या सहकार्याने नक्कीच महिला गरुड भरारी घेतील व दिवा सारख्या शहराचे नाव उज्ज्वल करतील असे कार्यक्रमाच्या संयोजिका किरण शीतकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले तसेच मंगळागौर उपक्रमात सहभागी होण्यासाठी महिलांनी लवकरात लवकर जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा असे ही त्यांनी यावेळी कळविण्यात आले आहे.



