ब्रेकिंग
मानपाडा पोलिसांनी अवघ्या तीन तासात अपहरण केलेल्या मुलाचा घेतला शोध, आमदार राजेश मोरे यांनी शिवसेनेच्या वतीने केल पोलिसांचे कौतुक…
अमित जाधव - संपादक

डोंबिवली. सकाळी ७.३० वाजता शाळेत जाणाऱ्या डोंबिवली मानपाडा हद्दीत एका सात वर्षाच्या मुलाचे खंडणी करीता अपहरण करण्यात आले होते, अपहरण कर्त्या मुलाच्या आई वडिलांनी ही बाब लक्षात येताच पोलीस स्टेशनला धाव घेतली व ह्या प्रकरणात पोलिसांनी गुप्तपणे तपास यंत्रणा कामाला लाऊन अगदी ३ ते साडेतीन तासात अपहरण केलेल्या मुलाची सुटका करुन गुंडाच्या मुस्क्या आवळल्या, ह्या त्वरित राबविलेल्या पोलीस यंत्रणेमुळे आज भयंकर प्रकार टळला, मानपाडा पोलिसांच्या तत्परतेचे आणि शौर्याचीदखल घेऊन शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, विवेक खामकर, दिनेश शिवलकर, सुदाम जाधव ह्यांनी मानपाडा पोलीस स्टेशन गाठून पोलिसांचे कौतुक करत अभिनंदन केले.