बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

स्वच्छता अमृत महोत्सवात विद्यार्थ्यांची चित्रकला आणि ‘टाकाऊ ते टिकावू’ प्रकल्पांची स्पर्धा ६५० शाळांचा सहभाग, दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहात होणार स्पर्धा,ठाणे स्वछता लीग म्हणून दिव्याचा देखील संघ दिवा डेअरडेहिल्स नावाने सहभाग घेणार….

अमित जाधव-संपादक

……………………………………
स्वच्छता अमृत महोत्सवात विद्यार्थ्यांची चित्रकला आणि ‘टाकाऊ ते टिकावू’ प्रकल्पांची स्पर्धा

६५० शाळांचा सहभाग, दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहात होणार स्पर्धा

तसेच, उपवन तलाव ते येऊर मानवी साखळी; स्वच्छतेसाठी श्रमदान

ठाणे (२१) : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यामध्ये ‘इंडियन स्वच्छता लीग’ हा स्वच्छता विषयक देशव्यापी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने ठाणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता विषयक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमांची सुरूवात शुक्रवार, 23 सप्टेंबर रोजी दोन टप्प्यात होणार आहे. सकाळी, उपवन तलाव ते येऊर गाव या भागात मानवी साखळी आणि श्रमदानाने परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. तर, दुपारी, दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात ६५० शाळांचा सहभाग असलेली चित्रकला स्पर्धा आणि ‘टाकाऊ ते टिकावू’ ही कला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने ‘ठाणे टायगर्स’ या अभिनव उपक्रमाचाही आरंभ होणार आहे.

उपवन तलाव ते येऊर गाव या मार्गावर ७.५ किमी अंतराची सुमारे ७५०० नागरिकांचा सहभाग असलेली मानवी साखळी तयार केली जाणार आहे. हे नागरिक श्रमदान करून त्यांच्या आसपासच्या परिसरातील कचरा गोळा करतील आणि स्वच्छता अमृत महोत्सवात सहभागी होतील. त्याच बरोबर, सफाई मित्रांची सफाई दिंडी, स्वच्छता दूतांना विविध सामग्रीचे वाटप, ठाणे स्वच्छता लीगचे उद्घाटन, कचरावेचकांची आरोग्य तपासणी, शालेय विदयार्थी चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.

केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने स्वच्छतेचा अमृत महोत्सव साजरा करताना ‘इंडियन स्वच्छता लीग’ हा राष्ट्रीय उपक्रम जाहीर केला आहे. त्यात, देशभरातील १८०० हून अधिक शहरे सहभागी होत आहेत. यामध्ये लोकसहभागावर भर असून स्वच्छता कार्यात तरूणाईचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी कचरा विरोधात युवक (#Youth V/s Garbage) ही टॅगलाईन जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रत्येक शहराने आपला संघ तयार करणे व या संघाचा कर्णधार जाहीर करणे अपेक्षित आहे. त्यानुसार, समस्त ठाणेकरांचे प्रतिनिधित्व करणारा ‘ठाणे टायगर्स’ हा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाच्या शुभेच्छा दूताचे (Mascot) अनावरणही प्रशासक तथा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या हस्ते याच सोहळ्यात करण्यात येईल.

शुक्रवार, 23 सप्टेंबर रोजी उपवन तलाव परिसर आणि दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात संपन्न होणाऱ्या ‘इंडियन स्वच्छता लीग’च्या कार्यक्रमात शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ठाणेकर युवकांनीही याप्रसंगी स्वयंस्फुर्तीने उपस्थित राहून राष्ट्रीय स्वच्छता उपक्रमात आपला सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. उपवन येथील सोहळ्यात महाविद्यालीयन विद्यार्थी पथनाट्य आणि फ्लॅशमॉबही सादर करणार आहेत.

कचऱ्यातील अद्भुत जग

स्वच्छता अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कोपरी येथे ‘कचऱ्यातील अद्भुत जग’ या आगळ्यावेगळ्या संग्रहालायचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. शहरातील कचऱ्यातून हाती आलेल्या संग्राह्य गोष्टी येथे पाहाता येतील. त्याचबरोबर, कोपरी आणि सिडको येथील नव्याने विकसित करण्यात आलेल्या व्यायामशाळांचे लोकार्पणही करण्यात येईल.

ठाणे स्वच्छता लीग

‘इंडियन स्वच्छता लीग’च्या धर्तीवर ठाणे महापालिकेने प्रभाग समिती स्तरावर ‘ठाणे स्वच्छता लीग’चे आयोजन केले आहे. त्यात नऊ प्रभाग समित्यांचे नऊ संघ सहभागी होतील. या संघांना नौपाडा नायक, मानपाडा मावळे, उथळसर योद्धा, लोकमान्य लिजंड्स, दिवा डेअरडेव्हिल्स, मुंब्रा मस्केटिअर्स, कळवा नाईट्स, वागळे वॉरिअर्स, वर्तक वीर अशी नावे देण्यात आली आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे