Breaking
ब्रेकिंग

मैत्री पुस्तकाशी या युट्युब चॅनेलचा स्तुत्य उपक्रम..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

मैत्री पुस्तकाशी या युट्युब चॅनेलचा स्तुत्य उपक्रम

वाचनाचे महत्त्व त्रिकालाबाधित आहे. हल्लीच्या मोबाइल, लॅपटॉपच्या प्रवेशद्वारातून व्हाट्सअप, इन्स्टा, ट्विटरच्या आभासी जगात शिरलेल्या आभासीवासियांनी ‘वाचन म्हणजे काय?’ असा प्रश्न विचारला तर नवल वाटू नये याला अर्थातच आपणच म्हणजे आजची वाचणारी पिढी जबाबदार आहोत. हल्लीची मुले वाचत नाहीत अशी बोंब सगळीकडे ऐकू येते. पण या मुलांनी वाचावे यासाठी आपण काय करतो, हा मुळात प्रश्न आहे.

मुलं साधारणत: दहा- बारा वर्षांची झाली की इतर कुणाचीही मदत न घेता हातात पुस्तक घेऊन वाचू शकतात. याच वेळेस त्यांच्या हातात योग्य पुस्तके पडली तर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ही गोष्ट उपयोगी ठरते. याच किशोरवयीन मुलांवर वाचनाचे संस्कार होऊन त्यांना वाचनाची गोडी लागावी पर्यायाने ती वाचनसमृद्ध, भाषासमृद्ध व्हावीत यासाठी प्रेरणादायी पुस्तके त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न “मैत्री पुस्तकाशी” या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून केला आहे.

या उपक्रमांतर्गत 100 भागांतून एकूण 25 पुस्तकांचा परिचय करून देण्यात आला आहे. मुलांनी पुस्तकांच्या जगात रममाण व्हावे या उद्देशातून. मैत्री पुस्तकाशी उपक्रमाच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त “माझे अभिवाचन” ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेसाठी वाचन करताना मुलांनी काही पुस्तके चाळावीत नि मग त्यातील निवडक पुस्तकातील निवडक उताऱ्यांचे किंवा गोष्टींचे अथवा आवडत्या कवितेचे वाचन करावे ही अपेक्षा होती. सदर स्पर्धेस मुंबई, नाशिकसह पूर्ण महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळाला. जवळपास 25 शाळांमधून 125 पेक्षा अधिक स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेऊन “आम्हीही वाचतो, वाचनाचे महत्त्व जाणतो” हेच अधोरेखित केले.

शुभम पेडामकर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे