दिव्यात रोशन भगत यांच आदर्श मित्र मंडळ आयोजित नवरात्र उत्सव “दिव्याची आई माऊली”चे शेकडो महिलांच्या उपस्थित आज सातव्या दिवशी भव्य दिव्य महाआरतीचे नियोजन….
अमित जाधव-संपादक
दिवा शहरात आदर्श मित्र मंडळ आयोजित नवरात्र उत्सव ‘दिव्याची आई माऊली’ श्री रोशन भगत,सौ.सपना रोशन भगत यांच आयोजन यंदा मोठ्या उत्साहात सुरू आहे मंडळाचे यंदाचे पंधरा वे वर्ष असून मोठ्या संख्येने नागरिक दिव्याच्या आई माऊलीच्या दर्शनाला येत आहेत.दिव्यातील शेकडो महिलांनी सातव्या दिवशी महा आरती घेत परिसर मन्त्रमुग्ध केला .दिव्यातील भव्य दिव्य असा रासगरबाचे आयोजन या ठिकाणी नागरिकांसाठी केलेले आहे दिव्यातील तुफान नागरिकांच्या प्रतिसादात रास गरबा सुरू असून डीजेच्या तालावर बेधुंद होईऊन नागरिक गरबा खेळत आहेत आदर्श मित्र मंडळाचे रोशन भगत यानी उत्कृष्ट नियोजन करत कोणतीही बाधा न येता कार्यक्रमचं आयोजन केले आहे.नऊ दिवस अनेक सामाजिक उपक्रमाच आयोजन करून सामाजिक सेवेच कार्य देखील मंडळा कडून सुरू ठेवण्यात आले आहे
उत्कृष्ट रास गरबा खेळणाऱ्या व्यक्तींना प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात येत आहेत तसेच आलेल्या मान्यवरांना देखील विशेष सन्मानित करण्यात येत आहे.मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अथक परिश्रम घेऊन योग्यरितीने प्रत्येक दिवस साजरा होत आहे.



