Breaking
ब्रेकिंग

दिव्यातील अनधिकृत इमारतींवर महापालिकेची कारवाई सुरू..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

 

*ठाणे (०३) :* मा. उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिका क्रमांक ४०५१/२०२३ मधील दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील एकूण दहा इमारतीपैकी तीन इमारती पूर्णपणे यापूर्वीच निष्कासित करण्यात आल्या होत्या. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, उर्वरित सात इमारतींपैकी सोमवारी दोन इमारतींवर कारवाई करण्यात आली. ठाणे महापालिकेने पोलिस बंदोबस्त ही कारवाई सुरू केली आहे.

आतापर्यंत, या कारवाईमध्ये दोन्ही इमारती रिक्त करण्यात आल्या. तेथील व्यावसायिक गाळे तोडण्यात आले. तसेच, सर्व सदनिकांचे दरवाजे तोडण्यात आले आहेत. उर्वरित इमारतींवरदेखील निष्कासनाची कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त (अतिक्रमण) उमेश बिरारी यांनी दिली.

या कारवाईस, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, महापालिका उपायुक्त उमेश बिरारी, परिमंडळ उपायुक्त सचिन सांगळे, दिनेश तायडे, दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे, सहाय्यक आयुक्त महेश जामनेर, सोनल काळे, सोमनाथ बनसोडे, विजय कावळे, गणेश चौधरी, सोपान भाईक आदी उपस्थित होते.

1/5 - (3 votes)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे