ब्रेकिंगमहाराष्ट्र
आमदारांन कडे किती प्रॉपर्टी असते हे मला चागल माहिती,मी ही एका आमदाराची पत्नी –करूना धनंजय मुंडे
अमित जाधव-संपादक
0
2
0
9
7
9
राज्यातील आमदारांसाठी मुंबईत ३०० घरं बांधण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी टीकेची झोड उठवली असून प्रसंगी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. ‘काही दिवसांपूर्वीच आमदारांच्या मानधनात वाढ झालीय. त्यांच्या कर्मचाऱ्यांचाही पगारही वाढवण्यात आलाय आणि आता आमदारांना घर बांधण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीय. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना गोरगरीब जनतेनं निवडून मुख्यमंत्री बनवलंय आणि ते आमदारांना घर देत आहेत, अशी उद्विग्नता करुणा मुंडे यांनी व्यक्त केली. ‘मुंबईतील आझाद मैदानात आजही आरोग्य सेविकांपासून एसटी कर्मचारी, ग्रामीण भागांत तळागाळात काम करणारे अनेक शिक्षक बेमुदत उपोषण करत आहेत. अवघ्या १० ते १२ हजार रुपयांच्या पगारासाठी त्यांना उपोषण करावं लागत आहे. त्यांचा साधा आवाजही मुख्यमंत्र्यांना ऐकू जात नाही, हे भयंकर आहे. मी स्वत: एका आमदाराची पत्नी आहे. माझा नवरा १५ वर्षांपासून आमदार आहे. एकेका आमदाराकडं किती प्रॉपर्टी असते हे मला चांगलं माहीत आहे. आज अनेक आमदारांकडं कोट्यवधींची आणि अब्जावधींची प्रॉपर्टी आहे. असं असताना त्यांना घरं दिली जात आहेत. उद्धव ठाकरे हे आमदारांची घरं भरण्यासाठी मुख्यमंत्री झालेत की गोरगरीब लोकांची दु:ख दूर करण्यासाठी,’ असा बोचरा सवालही त्यांनी केला.
0
2
0
9
7
9


