ठाणे, दिवा ता २२ मे : दिवा शहरातील साबेगाव परिसरात राहणाऱ्या छाया सतिश काळे ( वय ४१) चा विजेच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. छाया सतीश काळे नामक महिला रुम नं. ०२, मोतीराम निवास, सवाळे डॉक्टरच्या बाजूला साबेगाव रोड दिवा पूर्व येथे दुपारी पिण्याचे पाणी मोटर लावून भरत असताना विजेचा झटका लागल्याने खाली कोसळली असता सदर महिलेस दिव्यातील मेट्रो हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले होते परंतु परिस्थिती गंभीर असल्याने ताबडतोब सदर महिलेला कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे समजले. प्रसंगी सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदना नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून शवविच्छेद रिपोर्ट नुसार मृत्यूचे कारण उघडकीस येईल. सदर महिलेचे पती ठाणे येथे कामावर गेले असताना सदर घटना घडली होती. सदर महिलेस २ वर्षांचा एक मुलगा व पाच वर्षाची एक मुलगी आहे. सदर दुर्दैवी घटनेमुळे साबेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0
2
0
9
7
4
0
2
0
9
7
4



