ब्रेकिंग
कल्याण ग्रामीण महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या जाहीर सभेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित…
अमित जाधव - संपादक

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारार्थ आज मतदारसंघात मुख्यमंत्त्री एकनाथजी शिंदे जाहीर सभा पार पडली.कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे रूप पालटत आहे कारण आपल्या महायुती सरकारच्या कार्यकाळात आपण अनेक कल्याणकारी कामे मतदारसंघात मार्गी लावली. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील २७ गावांचा आपण सर्वांगाने विकास केला.तसेच मतदारसंघात अनेक विकासात्मक आणि शाश्वत कामे मार्गी लागली आहेत.भविष्यातही याच पद्धतीने सर्व विकासकामे याच जलद गतीने मार्गी लागतील, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त करत राजेश मोरे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. तर २७ गावांचा महापालिकेत समावेश, येथील नागरिकांना वाढीव करमाफी, ग्रामपंचायतींमधील सुमारे १ हजार कर्मचाऱ्यांचा महापालिकेत समावेश, रस्त्यांची उभारणी, पथदिवे यांसह विविध सुविधा दिल्या. याचबरोबर दिवा शहराला मुबलक पाणी, उत्तम दर्जाचे रस्ते अशी असंख्य कामे आपण कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मार्गी लावली.भविष्यातही आपले महायुती सरकार आणि आपले अधिकृत उमेदवार राजेश मोरे हे कायम कटिबध्द राहतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. तर यासाठी तुम्हा सर्वांच्या साथीची गरज असून येत्या २० नोव्हेंबर रोजी धनुष्यबाण चिन्हा समोरील बटन दाबून राजेश मोरे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन यावेळी मतदारांना केले. राजेश मोरे यांनी पाठपुरावा करून मतदारसंघात पूर्णत्वास नेलेली विकासकामे आणि भविष्यात करणार असलेल्या विविध कामांचा लेखाजोखा आलेल्या पुस्तिकेचे देखील प्रकाशन करण्यात आले.
प्रसंगी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजपा आणि महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते महिला आघाडी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.