बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिवा साबे गाव मध्ये घराला आग,संपूर्ण समान जळून खाक..

अमित जाधव - संपादक

आज दिनांक ०८/०६/२०२४ रोजी १४:२१ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार *(घटनेची माहिती देणारे:- शीळ अग्निशमन केंद्र)* एकविरा माऊली चाळ, यशोधा पाटील नगर, साबेगाव, दिवा, ठाणे या ठिकाणी एकविरा माऊली चाळ मधील रूम नंबर -०५, *(मालक- श्रीमती. सुनिता जयस्वाल, या रूममध्ये आग लागली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान १-फायर वाहनासह, ०१- रेस्क्यू वाहनासह उपस्थित आहेत.* सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.

*सदरची रूम तात्पुरत्या स्वरूपात बंद स्थितीत होती. आग लागल्यामुळे सदर रूम मधील फ्रिज, टीव्ही, कपाट, कपडे, इलेक्ट्रिक वायरिंग इत्यादी घरगुती साहित्य जळाल्याने नुकसान झाले आहे.*

*सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून १५:२७ वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझवण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे