Breaking
क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सलग तीन दिवस कळव्यातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

सलग तीन दिवस कळव्यातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून गेल्या तीन दिवसापासून कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये सहाय्यक आयुक्त (सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

कळवा प्रभाग समिती अंतर्गत दिनांक 25 ते 27 जुलै या कालावधीत अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. सोमवार 25 जुलै रोजी कळवा येथील शास्त्रीनगर येथील बांधकामांचे स्लॅब तोडून तर खारीगांव येथील मयूर हॉटेलच्या पाठीमागे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई २० लेबर, १ गॅस कटर च्या साहाय्याने करण्यात आली.

मंगळवार 26 जुलै रोजी गांवदेवी मंदिराशेजारील बांधकामावर स्लॅब कापून जेसीबी सह तोड कारवाई करण्यात आली. गांवदेवी मंदिर रोडवरील बांधकामाचे स्लॅब व अंतर्गत बांधकाम तोडण्यात आले. गावदेवी, कळवा परिसरातील बांधकामावर स्लॅब कापून जेसीबीसह कारवाई करण्यात आली. भुसार आळी, कळवा येथील बांधकामाचे ब्रेकरसह स्लॅप कापून कारवाई करण्यात आली. कुंभार आळी येथील बांधकामाचे कॉलम सह अंतर्गत बांधकाम तोडण्यात आले तसेच भास्कर नगर, कळवा येथील अनधिकृत झोपड्या हटवण्यात आल्या. बुधवार 27 जुलै रोजी कळवा मच्छी मार्केट येथील बांधकाम तोडण्यात आले. तसेच कळवा नाका, जुम्मा मस्जिद येथे ४ कॉलम कापून व अंतर्गत बांधकाम तोडण्यात आले. सदर दोन्ही कारवाया ३० लेबर, १ जेसीबी व १ गॅस कटरच्या सहाय्याने करण्यात आली.

सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे, उपआयुक्त परिमंडळ-1 मनिष जोशी, सहाय्यक आयुक्त (सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्या साहाय्याने पोलीस बंदोबस्तात केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे