दिव्यातील कष्टकरी व कामगार वर्ग महिलांच्या लहान मुलांसाठी सौ.रेश्माताई नरेश पवार यांचा सुस्त्य उपक्रम…..*
अमित जाधव-संपादक
दिव्यातील कष्टकरी व कामगार वर्ग महिलांसाठी सौ.रेश्माताई नरेश पवार यांचा सुस्त्य उपक्रम…
दिवा शहर दिवसेदिवस विकसित होत असून आज शहराची लोकसंख्या पाच लाखाच्या वर गेली आहेत त्यात अनेक कामगार वर्ग,कष्टकरी महिला ,युवा वर्गाचा समावेश होतो बहुतांश प्रभागात महिलावर्ग जास्त असून अनेक महिला या आर्थिक कारणामुळे मुंबई सारख्या शहरात नोकरी करत आहेत त्यामुळे बारा तास बाहेर कामकरत असताना लहान मुलांचा सांभाळ करणे हे जिकरीचे असते त्यामुळे अनेक महिला लहान मुलांना अन्यस्त्र बिनभरवशाच्या लोकांन कडे किंवा नातेवाईकां कडे सोडून आपल्या आर्थिक गरजाभागवण्यासाठी बाहेर पडतात आनि त्यामुले दोन ते तीन वर्षांच्या लहान मुलांची हेळसांड होते आणि हीच बाब काही महिला वर्गाने सौ.रेश्माताई पवार यांच्या निदर्शनात आणून देऊन त्यांनी तात्काळ पाडव्याच्या मुहूर्त साधत आज स्वखर्चाने माफक दरात लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी पाळणाघराची सोय करून दिली आहे त्या मध्ये लहानमुलांसाठी आकर्षक खेळणी,प्रशिक्षित केअर टेकर, बस सुविधा,लहान मुलांना आराम करण्याची सुविधा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे संपूर्ण पाळणा घर हे सी सी टी व्ही कॅमेरा बंदीस्त असेल त्यामुळे लहान मुलांना कोणताही त्रास इथे होणार नाही असे रेश्मा पवार ताईंनी स्पष्ट केले यामुळे सर्व महिलावर्गाने आनंद व्यक्त करत सौ.पवार ताईंचे आभार मानले