आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र
दिवा :- तन्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. ज्योती राजकांत पाटील यांच्या वतीने ८ मार्च रोजी दिव्यात महिला दिना निमित्त महिला सन्मान मेळाव्याचे आयोजन…..
अमित जाधव-संपादक
दिवा :- तन्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. ज्योती राजकांत पाटील यांच्या वतीने ८ मार्च रोजी दिव्यात महिला दिना निमित्त महिला सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दिव्यातील महिलांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम सौ. ज्योती पाटील करत असतात. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणाऱ्या ज्योती पाटील यांनी अलीकडेच गरीब गरजू नागरिकांसाठी मायेची थाळी हा उपक्रम सुरू केला आहे. ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तन्वी फाऊंडेशनच्या माध्यमातून महिला सन्मान मेळावाचे आयोजन करण्यात आले असल्याचे तन्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. ज्योती पाटील यांना सांगितले आहे.