गोवा राज्यातून छुप्या मार्गाने अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला मद्य साठा डोंबवलीत जप्त *३०,००,०००/-रु. किं. चा विदेशी मद्याचा साठा, साहित्य व वाहन ताब्यात…
अमित जाधव - संपादक

ठाणे – गुन्हे शाखा घटक-१ ठाणे येथे दि ०४/०६/२०२५ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, “काही इसम हे गोवा येथून कमी दज्यांच्या व कमी किंमतीच्या वेगवेगळ्या कंपनीव्या व ब्रहख्या विदेशी मद्याच्या बॉटल्स छूप्या मार्गाने बेकायदेशीररित्या डोंबिवली (पूर्व) नेरूरकर रोड, सुदामवाडी याठिकाणी आणून, त्या बॉटल्स वरील लेबल काढून त्याठिकाणी मूळ कंपनी/बैंड वे सारखे तुबेहूब batch, manufacturing, expiry date असे तयार केलेले बनावट लेबल सदर बॉटल्स वर लावून सदर मद्याचा साठा करून, त्याची महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या शहरात विक्री करत आहेत, अशी बातमी मिळाल्यावर, मा. वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे, गुन्हे शाखा घटक-१ ठाणे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने, दिनांक ०४/०६/२०२५ रोजी रात्री २०:२५ वा. डोंबिवली (पुर्व), सुदामवाडी येथील नेरुरकर रोडलगत सापळा रचून महिंद्रा बोलेरो पिकअप क्र. MH-OS-FJ-7884 या वाहनास ताब्यात घेवून तपासणी केली असता, त्यामध्ये मिळालेल्या बातमीप्रमाणे विदेशी मद्याचा साठा मिळून आला. सदर वाहनावरील चालक श्रीकांत तोकडे याच्याकडे मद्याच्या साठ्यासंबंधाचे कागदपत्राबाबत विचारपुस करता त्याने असमर्थता दर्शविली. त्यास सदर मद्याचा साठा कोठून आणला याबाबत विचारणा करता त्याने जवळच असलेले सुदामवाडी, पांडुरंग निवास चाळीतील एक कौलारु पडके घर दाखविले, सदर कौलारु घराची पाहणी करता त्यामध्ये वेगवेगळ्या विदेशी कंपन्यांचे/ब्रेडच्या मद्याच्या बॉटल्स खाकी रंगाच्या पुठ्ठ्याच्या खोक्यांमध्ये ठेवलेले आढळून आले.
गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दि. ०४/०६/२०२५ रात्री २०:२५ ते दि. ०५/०६/२०२५ रोजी सकाळी १०:०० वा. पर्यंत सलग दोन दिवस सुदामवाडी पांडुरंग निवास चाळ, नेरूरकर रोड डोंबिवली (पूर्व) जि. ठाणे या ठिकाणी तपासणी करून, Royal challenge, Mcdowells, Royal stage, OakSmith, Royal green, Imperial Blue, Romanov Vodka, Budweiser Magnum, Budweiser Premium, Budweiser Magna, Carlsberg Elephanta, Kingfisher premium, Kingfisher Strong अशा वेगवेगळ्या विदेशी मद्य कंपनी/बँड च्या Whisky आणि Beer च्या एकूण १८,२९० बॉटेल्स (४४७ पुठ्ठ्यांचे बॉक्स) असा साठा, मद्याच्या बॉटलवर बनावट लेबल चिकटविण्यासाठी वापरण्यात येणान्या, एक Hikoki कंपनीची हिरव्या रंगाची Heat Gun RH 600T, आणि दोन CLIF HG 100 C कंपनीच्या दोन भगव्या रंगाच्या Hot Air Guns, मद्याच्या बॉटलवर बनावट बंध नंबर, मॅन्युफॅक्चरीग डेट, एक्सपायरी डेट असा छाप उमटविण्यासाठी वापरण्यात येणारे काळया व निळ्या रंगाचे मिनी प्रिन्टर मशीन आणि ३ कार्टरेज आणि वरील प्रमाणे मद्य कंपनीचे / बँडसारखे हुबेहुब -Batch, Manufacturing, Expiry Date असे तयार केलेले बनावट लेबल्स असे साहित्य आणि मद्याचा साठा वाहतूक करण्यासाठी वापरलेले महिन्द्रा मॅक्स पिकअप क्र. MHO5-FJ-7884 हे वाहन असा एकूण ३०,००,०००/-रु. किं. चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. अटक आरोपी
१) श्रीकांत भागिरथ तोकडे, वय २७ वर्षे, धंदा ड्रायव्हर, राह. साई सहारा चाळ, रूम नं. ३ मराठा टॉवर जवळ, आरके नगर, टिटवाळा (पूर्व), ता. कल्याण जि. ठाणे,
२) वकील निवास मंडल, वय २३ वर्षे, धंदा क्लिनर, राह. समर्थ नगर रूम नं. १५, काकाच्या ढाब्याजवळ,
श्रीमलंगरोड, गांदिवली, कल्याण पू, जि.ठाणे,
३) रवी संतोष तिवारी, वय ३० वर्षे, धंदा-नोकरी, राह.ठी. सुदाम वाडी, माधव निवास बिल्डींग, पांडुरंग निवास चाळ,
नेरूळकर रोड, डोंबिवली पूर्व, जि-ठाणे,
४) संजीत हजारी यादव, वय १९ वर्षे, धंदा-नोकरी, राह. ठी. सुदाम वाडी, माधव निवास बिल्डींग, पांडुरंग निवास चाळ, नेरूरकर रोड, डोंबिवली पूर्व, जि-ठाणे,
सदर आरोपीवर वेगवेगळ्या कलामन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे
वरील प्रमाणे विदेशी मद्याचा साठयाची वाहतूक करणारा श्रीकांत तोकडे हा महिंद्रा पिकअप कंपनीचा ड्रायव्हर असून वकील मंडल हा क्लिनर आहे, तसेच रवि तिवारी आणि संजीत यादव यांचे ताब्यात सदर विदेशी मद्याचा साठा सुदामवाडी पांडुरंग निवास वाळ, नेरूरकर रोड डोंबिवली (पूर्व) जि. ठाणे या ठिकाणी मिळून आलेला आहे. सदर विदेशी मद्याच्या साठ्या संबंधाने अधिक तपास गुन्हे शाखा, घटक-१, ठाणेकडून करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी श्री. विनायक देशमुख, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), ठाणे, श्री अमरसिंह जाधव, पोलीस उर आयुक्त, गुन्हे ठाणे, श्री शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त, शोध-१, गुन्हे शाखा, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सचिन गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे, दिपक घुगे, पो. उपनिरीक्षक, रविंद्र पाटील, पो उपनिरीक्षक, सपोउनिरी दयानंद नाईक, सुनिल माने, दिपक जाधव, पोहवा/संदीप महाडिक, पोहवा/दिपक जाधव, चापोहवा/बाळू मुकणे, पोशि/सागर सुरळकर यांनी केलेली आहे.