दिवा शहरातील महिलांवर होणारे अत्याचार निर्मूलनासाठी दिवा भाजपच्या सौ सपना रोशन भगत आक्रमक,दिव्यात स्वतंत्र महिला पोलिस अधिकारी नियुक्त करावे असे मुंब्रा पोलिसाना निवेदन..
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता २६ डिसें : दिव्यात भाजपचे महिला अध्यक्ष सौ सपना रोशन भगत यांचे मुंब्रा पोलिसाना निवेदन देत दिव्यात महीला पोलिस अधिकारी नियुक्त करण्यात यावे असे मुंब्रा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री निवृत्ती कोल्हटकर यांना निवेदन देण्यात आले आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दिवा शहराची लोकसंख्या हि 5 लाखापेक्षा जास्त असून महिलांवर होणारी छेडछाड, विनयभंग तसेच अत्याचार अशा अनेक घटना घडत आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती अशा बऱ्याच घटना सर्रास घडत आहेत. अशी प्रकरणे दिव्यात वाढत असून दिव्यात महिला पोलिसांची कमतरता आहे असे दिसून येत आहे. म्हणून दिवा शहरात महिलांचे प्रश्न वारंवार उदभवतात त्यासाठी महिला पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी वाढविणे अत्यावश्यक आहे असे दिवा भाजपाच्या महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सपना रोशन भगत आणी इतर पदाधिकारी महिलांनी निवेदन दिले आहे.