बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

बंजारा वाडी, येथे बंजारा समाजातील गोरगरीब बाधवांसोबत बदलापूर येथे प्रेरणा फाउंडेशन ची दिवाळी साजरी….

अमित जाधव-संपादक

*बंजारा वाडी, येथे बंजारा समाजातील गोरगरीब बाधवांसोबत बदलापूर येथे प्रेरणा फाउंडेशन ची दिवाळी साजरी*

प्रेरणा फाउंडेशन ठाणे महाराष्ट्र राज्य रजि. 564/एफ 38784/बदलापूर/ठाणे /महाराष्ट्र. प्रेरणा फाऊंडेशन ही सामाजिक संस्था गेले तीन वर्ष गोर गरिबांचा दाता ठरला आहे. बंजारा वाडी बदलापूर दि. 02/11/2021 मंगळवार रोजी दुपारी 3 ते 6 वाजता दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दिवाळी निमित्ताने, दिवाळी धनत्रयोदशी च्या दिवशी किराणा वाटप आणि स्वीट वाटपाचा कार्यक्रम केला.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका/अध्यक्षा दिप्ती (प्रेरणा)गांवकर यांनी केले. तसेच या कार्यक्रमासाठी लागणारे सामान पॅकिंगसाठी दिप्ती (प्रेरणा) गावकर यांना खजिनदार दिव्या गावकर, सचिव वैभव गोविंद कुलकर्णी, सभासद कु. रोहन गांवकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचा उद्देश हाच की गोर गरीब, अनाथ मुले, आजी आजोबा, व भटकी वंचित मुले या सगळ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद तसेच गोरगरिबांची दिवाळी फुलना फुलाची पाकळी देउन साजरा केली. गोरगरिबांचे समाधान हेच प्रेरणा फाउंडेशन चे समाधान. या कार्यक्रमासाठी श्री संजीव जैन, सौ. रेखा राठोड, परेश परब, संतोष सावंत, संतोष घाणेकर, अप्पा कसबेकर, राजेश मोरे, यांचे सहकार्य लाभले.
किराणा माल, दिवाळी फराळ, व मिठाई असेच प्रत्येक कुटूंबाला असे बंजारा वाडीत सामान वाटप केले. मिठाई देताना गोर गरिबांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून प्रेरणा फाउंडेशन ची दिवाळी ही सुंदर साजरी झाली. प्रेरणा फाउंडेशन च्या संस्थापिका/अध्यक्षा दिप्ती (प्रेरणा) गांवकर यांनी व्यसनाधीन झालेल्या लोकांना दारूचे दुष्परिमाण सांगितले. व सध्या चालू असलेल्या कोरोना आजारापासून आपण स्वतः ची काळजी कशी घ्यावी याचे महत्त्व सांगून तेथील गंभीर परिस्तिथी लक्षात घेऊन काही लोकांना रहाण्यासाठी झोपड्या व मुलांना शिक्षणाची जबाबदारी आपण स्वतः घेऊ असे प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका प्रेरणा गावकर यांनी सांगितले बऱ्याच लोकांच्या जीवनातील समस्या सोडवण्यातही मुलाखत घेऊन त्याची यादी बनवली नंतर मुलांना मिठाई खाऊ वाटून कार्यक्रमाची सांगता केली. प्रेरणा फाउंडेशन गोरगरिबांसाठी नेहमीच तत्पर असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे