ठाण्यातील कळवा विभागाच्या शिवसेनिकांची दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात वेळेवर पोहचविण्यासाठी धडपड….
अमित जाधव-संपादक
ठाण्यातील कळवा विभागाच्या शिवसेनिकांची दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात वेळेवर पोहचविण्यासाठी धडपड.
ठाणे :- ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे यांची शिवसेना आजही पाहायला मिळते.शालांत परीक्षाचे दडपण हे लहान वयातील विद्यार्थ्यांना असते हे सर्व प्रथम धर्मवीर आनंद दिघे यांनी जाणलं व ते दडपण कमी करण्यासाठी दिघे यांनी सराव परीक्षा शाखेत सुरू केल्या या अभिनव उपक्रमा मुळे ठाणेकर विद्यार्थी दडपण मुक्त झाला व शालांत परीक्षेत अव्वल येऊन ठाण्याचा नावलौकिक वाढविण्यात यशस्वी झाला याचं सर्व श्रेय आनंद दिघे व त्यांचा निष्ठावंत शिवसेनीकानाच मिळते.
आजही दहावीच्या परीक्षा सुरु झाल्या पण विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेत कसा पोहचल या करिता भर उन्हात कळवा विभागाचे जेष्ठ शिवसेनीक धावपळ करतांना दिसले.मिळेल त्या वाहतूक साधन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून परीक्षा केंद्रावर वेळेतकसे पोहोचवता येतील ही काळजी त्यांच्यात दिसली.
धर्मवीर आनंद दिघे व त्यांच्या निष्ठावंताच्या मेहनती मुळेच आज ही ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
आज पासून दहावीची (SSC) परिक्षा सुरू होत आहे. जिथे शाळा तिथेच परिक्षा केंद्र हे धोरण शासनाने राबऊन विद्यार्थी व पालकांना दिलासा दिला.परंतु कळव्यातील शेकडो विद्यार्थी ठाणे शहरातील नामांकित शाळेत शिक्षण घेत आहेत .व त्यांचे परिक्षा केंद्र ठाणे येथे आहे. सदर बाब लक्षात घेऊन ठाणे येथे जाणाऱ्या परिक्षार्थी विद्यार्थी यांचे साठीऐनवेळी गैरसोय होऊ नये म्हणून रिक्षा व बसेसमधे प्रवेश मिळणेसाठी शिवसेना पदाधीकारी नेहमीप्रमाणे उपस्थित होते.भाडे नाकारणार्या रिक्षा बांधवाना विनंती करुन सदर शाळेच्या ठीकाणी ठाणे येथे जाणेस विनंती केली. तसेच बस मधे विद्यार्थी व पालकांना पुढील दरवाजाने प्रवेश मिळऊन दिला .त्यामुळे आजच्या पहिल्या दिवसी विद्यार्थी व पालकांना वेळेवर पोहोचता आले.नेहमीप्रमाणे कळवा शाखेने विद्यार्थ्यांची काळजी घेतली त्याबद्दल काही पालकांनी कळवा शाखेचे आभार व्यक्त केले अशी प्रतिक्रिया कळवा विभागाचे जेष्ठ पण तरुण शिवसेनिक विजय देसाई यांनी दैनिक ठाणे जीवन व कळवा टाइम्स ला दिली आहे