*⭕️आणखी एका एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.*
नाशिक, ता 19 नोव्हें : नाशिकमध्ये आणखी एक दुखद घटना समोर आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं महिन्याभरापासून आंदोलन सुरु आहे. पण या आंदोलनावर राज्य सरकारडून कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे या आंदोलनावर तोडगा निघाला नाही म्हणून एसटीचं खासगीकरण होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. पण या चर्चेमुळे आणि मागण्या मान्य न झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचं गहिनाथ गायकवाड असं नाव आहे.
नाशिकच्या पेठ आगारातील गहिनाथ गायकवाड हे एसटी कर्मचाऱ्यांचं सुरु असलेल्या आंदोलनातही सहभागी झाले होते. ते मूळचे बीड येथील रहिवासी आहेत. कमी पगार आणि कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबात एक वर्षाचा मुलगा आणि पत्नी आहे.


