बांधकाम क्षेत्रातील सर्व परवानग्या जलदगतीने मिळाव्यात यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार…
अमित जाधव-संपादक
बांधकाम क्षेत्रातील सर्व परवानग्या जलदगतीने मिळाव्यात यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार
सिडको प्राधिकरणामध्ये एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली (युडीसीपीआर- २०२०) लागू झाल्यामुळे त्याअंतर्गत मिळणाऱ्या परवानग्यांवरील भाडेपट्टा शुल्क भरण्यासाठी हफ्त्यांची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सिडकोमधील बांधकाम विषयक परवानग्या जलदगतीने मिळाव्यात यासाठी सिडको प्राधिकरणाची ऑनलाईन सॅप यंत्रणा सोपी आणि सुटसुटीत करण्यासोबतच तिथे ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबईतील विकासकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून त्याअंतर्गत सिडकोमध्ये विविध परवानग्या मिळण्यासाठी होणाऱ्या विलंबाची देखील त्यांनी दखल घेतली आहे.
सिडकोमधील कामे ही अधिक जलदगतीने व्हावीत यासाठी सिडकोची ऑनलाईन परवानग्या घेण्याची सॅप यंत्रणा अधिक सुटसुटीतआणि गतीमान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच राज्यात बांधकामविषयक सर्व नियमांचे सुसुत्रीकरण होण्यासाठी लागू करण्यात आलेल्या युनिफाईड डिसीपीआरचे फायदे सिडकोत मिळवून देण्यात येणार आहेत.


