Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील दोन वाहनांना अपघात झाल्याचं बातमी निदर्शनात आली आहे. मुंबई महापालिकेजवळ हा किरकोळ अपघात झाला यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्रवीर सावरकर स्मारकाला भेट दिल्यानंतर ते पावसाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट देण्यासाठी रवाना झाले. यावेळी पालिकेच्या मुख्यालयाजवळ येताना त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला. ताफ्यातील एका कारने पुढच्या कारला मागून जोरदार धडक दिली. पुढच्या कार चालकाने आपत्कालीन ब्रेक दाबल्याने हा प्रकार घडला.पुढची कार अचानक थांबल्याने मागच्या कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने ती पुढच्या कारवर आदळली. परंतू या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही, अशी माहिती देखील मिळाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे