0
2
0
9
7
4
♦लोकल प्रवासात “भारतीय संविधानाचे” स्मरणमध्य रेल्वे चा नवा उपक्रम
नागरिकांना भारतीय संविधानाचे स्मरण करून देण्यासाठी मध्य रेल्वेने ‘संविधान रेल डबा’ अशी वेगळी संकल्पना अंमलात आणली आहे. या संकल्पनेतून *लोकलच्या सर्व डब्यांमध्ये संविधानाची प्रत लावण्यात आली आहे.*
यामध्ये छायाचित्रासह भारतीय संविधानाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. भारतीय नागरिक, भारताचे एक सर्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व *नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय*, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, आठवण भारतीय संविधानातून करून देण्यात आली आहे.
संविधानाचे पहिले पान असलेले प्रस्ताविक लोकलच्या सर्व डब्यात लावण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
0
2
0
9
7
4



