ठाणे ; : छत्तीसगडमधील धर्मसंसदेत अभिजित सरग उर्फ कालीचरण बाबाने महात्मा गांधींजी बाबत संतापजनक वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला होता. या वादाचे पडसाद ठाण्यात देखील उमटले होते. मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी नौपाडा पोलिसात या बाबाविरोधात २९ डिसेंबर २०२१ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी भादवी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात अभिजित सरग उर्फ कालीचरण बाबाला नौपाडा पोलिसांनी रायपूर येथील मध्यवर्ती तुरुंगातून ताब्यात घेतले आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत कालीचरण बाबाला घेऊन पोलीस पथक ठाण्यात पोहचेल अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.
छत्तीसगडमधील रायपूर येथील धर्मसंसदेत कालीचरण बाबाने महात्मा गांधींजी बाबत संतापजनक वक्तव्य केले होते. त्याच बरोबर विरोधात जातील त्यांना कापुन टाकेल अस वक्तव्य केले होते. त्यामुळे नवा वाद उभा राहिला होता.