
ठाणे ०३ – आज गुरुवार, ०३ एप्रिल रोजी सीपी हाऊस, कौसा, येथील तळ अधिक चार मजली अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आली. मा. उच्च न्यायालयाचे आदेशानुसार महापालिकेने ही कारवाई केली.
अतिक्रमण विभागाने स्थानिक पोलीसांच्या बंदोबस्तात ही कारवाई केली. यावेळी, उपायुक्त शंकर पाटोळे, सहायक आयुक्त नौपाडा सोपान भाईक, मुंब्र्याचे सहायक आयुक्त बाळू पिचड, दिव्याचे सहायक आयुक्त गिरी उपस्थित होते.