बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

मराठा आरक्षणावर आंदोलनाची पुढील दिशा जाहीर….

अमित जाधव - संपादक

*मराठा आंदोलनाची पुढील दिशा जाहीर*

१. २४ फेब्रुवारीपासून मराठ्यांचे राज्यभर “आदर्श रास्तारोको” आंदोलन सुरु होणार.

२. प्रत्येक मराठ्याने आपापल्या गावाची/शहराची जबाबदारी सांभाळावी.

३. सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी. यासाठी हे आंदोलन असेल.

४. आंदोलनाची वेळ सकाळी १०.३० ते दुपारी १:०० आणि सायंकाळी ४:० ते ७:०० असेल.

५. या वेळात गावातील सर्व मराठे रस्त्यावर येऊन ठाण मांडतील. आंदोलन दररोज आणि बेमुदत काळासाठी असेल.

६. आंदोलन शांततेत होईल परंतु एकही गाडी पुढे जाणार नाही.

७. राजकीय नेत्यांना (जि.परिषद सदस्य, सभापती आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक) यांना यापुढे मराठे दारात येऊ देणार नाहीत.

८. परीक्षेचा काळ सुरु आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर व घरी जाण्यास त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

९. गावातील मुख्य रस्ता कोणताही असो, जिल्हामार्ग, राज्यमार्ग किवा राष्ट्रीय महामार्ग. आंदोलन काळात सर्व रस्ते बंद राहतील.

१०. १ मार्चला अंतरवाली सराटी येथे सर्व आजी-माजी मराठा आमदार खासदार मंत्री यांची बैठक होणार. सगेसोयरे बद्दल काय भूमिका घेतात, यावरून तो नेता मराठ्यांच्या बाजूने की विरोधात हे समाज ठरवणार.

११. ३ मार्चला जिल्ह्याच्या ठिकाणी एकच मोठा रास्ता रोको होणार. या रास्तारोकोला जिल्ह्यातील मराठा बांधव लाखोंच्या संख्येने जमणार.

१२. निवडणूक जवळ आली आहे. प्रचारासाठी एकही गाडी गावात येणार नाही. आली तर परत जाणार नाही.

१३. *२४ तारखेपासून महाराष्ट्र शांततेत जागेवर ठप्प असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे