ब्रेकिंग
दिव्यात विकास म्हात्रे गेट येथे ठाकरे च्या शिवसेनेचा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
दिवा -अयोध्या येथील श्री राममंदिर व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिवा शहर आयोजित ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात ऐतिहासिक महाआरती, मिठाई वाटप तर कुठे फटाके फोडत ठाकरे गटाने मोठ्या उत्साहात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा दिव्यात साजरा केला.
विकास म्हात्रे गेट येथे रोहीदास मुंडे संघटक यांच्या नियोजनात ठाकरे गटाचे नवनिर्वाचित उप विभागप्रमुख योगेश निकम यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा च्या वेळी आकाशात जय श्री राम घोषणा देत एकाच वेळी 50 कंदील सोडत अनोखा दीपोत्सव साजरा केला व परिसरील नागरीकांना मिठाई वाटप करून तोंड गोड केले.यावेळी प्रफुल पष्टे शाखाप्रमुख, प्रशांत वटकर उपशाखाप्रमुख,अनिश चव्हाण, ओंकार फणसेकर, शुभम कदम, राजुन माळवदकर, आशिष पंड्या सदाशिव कोल्हे विघ्नेश गोरीवाले, नितेश पोटे, अरविंद जावळीकर, अजिंक्य पवार, प्रणिल कांबळे, विनित घाग, जितेंद्र सोनवणे, आकार सोनवणे, गणेश गोरीवळे, देवेश गोरीवळे, देवेश गोरीवळे आदी पदाधिकारी व मित्रमंडळी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
0
2
0
9
7
4



