
धावत्या लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. आयुष जतीन दोशी असे या 20 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. डोंबिवलीमध्ये ही घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने आयुष हा रेल्वेच्या डब्ब्याजवळ स्टीलच्या पाईपला धरून उभा होता. तेव्हा त्याचा हात निसटल्याने तो लोकलमधून खाली पडला. यात गंभीर जखमी झालेल्या आयुषला रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले.