पुढील वर्षी पासून महापालिकेने छटपूजेसाठी नियोजन बंध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात -रोहिदास मुंडे
अमित जाधव-संपादक
पुढील वर्षांपासून महापालिकेने छट पूजेसाठी नियोजनबद्ध सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात- रोहिदास मुंडे
दिव्यात छट पूजा उत्सव उत्साहात संपन्न
दिवा:- छटपूजा या उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने पुढील वर्षापासून महापालिकेने भाविकांसाठी विशेष पोलीस सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा पद्धतीची मागणी छठ पूजा उत्सवाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केली आहे.भारतीय जनता पार्टी नेहमीच उत्तर भारतीय समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली असून यापुढेही या नागरिकांच्या सुविधांसाठी आपण प्रयत्नशील असू असे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिव्यात छटपूजा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. उत्तर भारतीय नागरिकांच्या श्रद्धेचा व आस्थेचा विषय असणाऱ्या छटपूजा कार्यक्रमासाठी नागरिकांनी विविध ठिकाणी गर्दी केली होती. भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे इतर पदाधिकारी यांनी भाविकांना सहकार्य केले. छटपूजेसाठी महापालिकेमार्फत दिवा शहरात पुढील वर्षापासून सुविधा करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी या निमित्ताने केली. दिव्यात उत्तर भारतीय समाज मोठ्या संख्येने असून या समाजाच्या श्रद्धा व आस्था जोपासण्यासाठी महापालिकेने छटपूजा कार्यक्रम साठी या सणाच्या पूर्वी योग्य त्या व्यवस्था करण्यात याव्यात अशी मागणी देखील रोहिदास मुंडे यांनी या निमित्ताने केली आहे. संपूर्ण शहरात छटपूजा निमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.यावेळी दिवा उत्तरभारतीय अध्यक्ष अजय सिंग उत्तर भारतीय महिला अध्यक्षा सुनिता प्रजापति मंडळ सरचिटणीस युवराज यादव दिलीप भोईर महिला अध्यक्ष ज्योती पाटील ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत सपना भगत वार्ड अध्यक्ष नागेश पवार,प्रकाश पाटील, माजी मंडलाध्यक्ष सुधीर म्हात्रे प्रवीण पाटील मधुकर पाटील डॉक्टर सेल आघाडी विद्यासागर दुबे गुजराती सेल अध्यक्ष रमेश वोरा जीलाजित तिवारी अवधराज राजभर राहुल साहू श्रीराम भगत नयन भगत वीरेंद्र गुप्ता प्रशांत आंबोणकर रमेश यादव शीला गुप्ता रेश्मा पवार ओपी तिवारी उत्तम सिंग गौरीशंकर पटवा अमरनाथ गुप्ता आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते