आताची मोठी बातमी! नितीन देसाई मृत्यू प्रकरण, ‘या’ पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल..
अमित जाधव - संपादक
कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात आताची मोठी घडामोड घडली आहे. नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा नितीन देसाई यांनी खालापूर पोलीस स्थानकात लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे ECL फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी असे एकूण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन देसाईंच्या पत्नीची तक्रार
2 ऑगस्टला कलादिग्दर्शक आणि कर्जतमधल्या एनडी फिल्म स्टुडिओचे मालक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी चार ऑगस्टला नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी लेखी तक्रार दाखल केली. ECL फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुपचे अधिकाऱ्यांनी कर्ज प्रकरणामध्ये वारंवार तगादा लावून माननसिक त्रा दिला. या मानसिक त्रासाला कंटाळून नितीन देसाई यांनी आत्महत्या केली असं या तक्रारीत म्हटलं होतं.
या तक्रारीच्या आधारे खालापूर पोलीस स्थानकात ECL फायनान्स कंपनी, एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी असे एकूण 5 जणांविरोधात कलम 306, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.