भारतीय मराठा संघाच्यावतीने दिव्यात जागर स्त्री-शक्तीचा उत्साहात..
अमित जाधव-संपादक
*⭕️भारतीय मराठा संघाच्यावतीने दिव्यात जागर स्त्री-शक्तीचा उत्साहात.*
ठाणे / दिवा, ता 10 मार्च (संतोष पडवळ) : दिव्यात भारतीय मराठा संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अविनाश पवार व प्रदेश सचिव एस डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत जागतिक महिला दिनी “जागर स्त्री शक्तीचा” या संकल्पने अंतर्गत महिलांकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी सामाजिक व व्यक्तिगत जीवनामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना “विशेष महिला पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.
भारतीय मराठा संघ उपाध्यक्षा, शिक्षिका अनघा जाधव यांच्यामार्फत स्त्रियांकरिता “आधुनिक स्त्री व कौटुंबिक समस्या” या विषयावर व्याख्यान देण्यात आले.तसेच लकी ड्रॉ व विविध बक्षीसे सुद्धा देण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपक पालांडे, ठाणे महानगर संपर्कप्रमुख अरुण फणसे, ठाणे जिल्हा सचिव तपस्या कश्यप, ठाणे शहर अध्यक्षा उषा केंजळे, उल्हासनगर शहर अध्यक्षा सुनिता गव्हाणे, उपाध्यक्षा कल्पना देवरुखकर-आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची धुरा भारतीय मराठा संघाच्या दिवा शहर अध्यक्षा निकिता सालप, उपाध्यक्षा भावना गुरव, संघटक गौरी बेर्डे व माया रनावरे, दिवा शहर अध्यक्ष निकेश खानविलकर, उपाध्यक्ष सुधिर घाणेकर, खजिनदार रामकृष्ण सावंत, संघटक समीर सावंत, संकेत तावडे, सल्लागार दिलीप लटके यांनी सांभाळली.
दिवा शहरातील राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने शिवसेना नगरसेविका दर्शना म्हात्रे, समाजसेवीका अर्चना पाटील, मयुरी पोरजी, सीमा पाटील, सपना पाटील, अश्विनी केंद्रे, जयस्वालताई, राष्ट्रवादी कल्याण ग्रामीण महिला अध्यक्षा ज्योती पाटील आदींनी आपला विशेष सहभाग नोंदवुन महिलाना प्रोत्साहन् दिले. विविध महिला मंडळ व बचत गटांच्या अध्यक्षा अरुणा मस्कर, नम्रता खराडे, आशालता मंगेशकर, साक्षी उतेकर, उषा म्हात्रे, पार्वती पाटील, आरती घोरपडे, पूजा गुरव, सेजल गवाली, भावना मुरडकर, अलका गुरव, रश्मी डोंगरे, दिपाली वायकर आदी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता पांडुरंग सालप, संदेश भोसले, अभिजीत गिरसे, महेश गुरव, गौरव कदम, सागर तळेकर, ओमकार नाईक राज गोवरे आदींनी विशेष मेहनत घेतली.


