Breaking
ब्रेकिंग

कळव्यात इमारतीचा स्लॅब पडला,तीन जन जखमी…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिनांक १२/०६/२०२३ रोजी २३:५९ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार *(घटनेची माहिती देणारे:- आपत्ती व्यवस्थापन अधिकारी)* पल्लवी अपार्टमेंट समोर, ओम कृष्णा को-ऑ. हाऊसिंग सोसायटी, भुसार आळी, कळवा, ठाणे (प.) या ठिकाणी ओम कृष्ण को-ऑ. हाऊसिंग सोसायटी *(तळ+०४ मजली इमारत, ३० ते ३५ वर्षे जुनी इमारत, C1 या धोकादायक इमारतीच्या वर्गवारीत असलेली इमारत)* या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक -३०२ मधील हॉलचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक २०३ मध्ये पडला आहे. *सदर घटनास्थळी मा. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, बांधकाम विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पिकअप वाहनासह, अग्निशमन दलाचे जवान ०१-इमर्जन्सी टेंडर व ०१-रेस्क्यु वाहनासह, कळवा पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत. सदर घटनास्थळी तीन व्यक्तींना दुखापत झाली आहे.*

*सदर घटनेत रूम क्रमांक ३०२ मधील तीन व्यक्ती जखमी असून त्यांची माहिती पुढील प्रमाणे:-*

१) श्री मयूर दांडेकर. ( पु/ वय अंदाजे ४० वर्षे, *(सदर व्यक्तीच्या पायाला व पाठीला दुखापत झाली आहे.)*

२). श्री मनोहर दांडेकर, ( पु/ वय अंदाजे ७० वर्षे, *(सदर व्यक्तीच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे.)*

३) सौ. मनीषा दांडेकर, ( स्त्री/ वय अंदाजे ६५ वर्षे, *(सदर व्यक्तीच्या कमरेला व छातीला दुखापत झाली आहे.)*
*सदर तीनही व्यक्तींना उपचाराकरिता माऊली हॉस्पिटल, कळवा येथे दाखल करण्यात आले आहे.*

*सदर इमारतीमधील रहिवाशांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.*

*तसेच सदर इमारत धोकादायक स्थितीत असल्याने ठा.म. पा. कळवा प्रभाग समिती, बांधकाम विभागाचे अधिकारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या आदेशाने पूर्णतः रिकामी करण्यात आली आहे.*

*सदर इमारतीमधील रहिवाशांनी आपआली राहण्याची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात स्वतःच्या नातेवाईकांकडे केली आहे.*

*सदर इमारतीचा तपशील पुढील प्रमाणे:-*

*इमारतीमध्ये एकूण ३०-सदनिका आहेत.*

*तळ मजल्यावरती एकूण-०७ सदनिका आहेत.*
*१)* रूम क्रमांक:-०१ *(मालक- सौ संचिता मोरजकर.)*
*२)* रूम क्रमांक:-०२ *(मालक- कल्पिता मानकामे.)*
*३)* रूम क्रमांक:-०३ *(मालक- श्री. विजय नवलकर.)*
*४)* रूम क्रमांक:-०४ *(मालक- श्री. निलेश महाडिक.)*
*५)* रूम क्रमांक :- ०५ *(मालक- श्री. विवेक मिस्त्री.)*
*६)* रूम क्रमांक :- ०६ *(मालक- श्री. सौ. तेजश्री मेस्त्री.)*
*७)* रूम क्रमांक :- ०७ *(मालक- श्री. विनायक मयेकर.)*

*पहिल्या मजल्यावरती एकूण-०५ रूम आहेत.*
*१)* रूम क्रमांक:-१०१ *(मालक- श्री. विजय दळवी.)*
*२)* रूम क्रमांक:-१०२ *(मालक- श्री. किशोर नंदू.)*
*३)* रूम क्रमांक:-१०३ *(मालक- श्री. सुनील राणे.)*
*४)* रूम क्रमांक:-१०४ *(मालक – अज्ञात.)*
*५)* रूम क्रमांक:-१०५ *(मालक- श्री प्रवीण विसरिया.)*

*दुसऱ्या मजल्यावरती एकूण-०६ रूम आहेत.*
*१)* रूम क्रमांक:-२०१ *(मालक:- श्री. सदानंद इंदुलकर.)*
*२)* रूम क्रमांक:-२०२ *(मालक:- सौ. अंकिता देसाई)*
*३)* रूम क्रमांक:-२०३ *(मालक:- कू. मृणाली पेडणेकर.)*
*४)* रूम क्रमांक:-१०४ *(मालक:- श्री. श्यामसुंदर परब.)*
*५)* रूम क्रमांक:-१०५ *(मालक:- श्री. राजेंद्र पटेल.)*
*६)* रूम क्रमांक:-१०६ *(मालक:- श्री. सुनील बागवे.)*

*तिसऱ्या मजल्यावरती एकूण-०६ रूम आहेत.*
*१)* रूम क्रमांक:-३०१ *(मालक:- श्री. परमानंद गोसावी.)*
*२)* रूम क्रमांक:-३०२ *(मालक:- श्री मनोहर दांडेकर.)*
*३)* रूम क्रमांक:-३०३ *(मालक:- श्री सदिक अली.)*
*४)* रूम क्रमांक:-३०४ *(मालक:- सौ धनश्री गुरव.)*
*५)* रूम क्रमांक:-३०५ *(मालक:- श्री. सुनील खलप.)*
*६)* रूम क्रमांक:-३०६ *(मालक:- सौ. सुशीला शेट्टी.)*

*चौथ्या मजल्यावरती एकूण-०६ रूम आहेत.*
*१)* रूम क्रमांक:-४०१ *(मालक:- श्री. राजेंद्र नवाळे.)*
*२)* रूम क्रमांक:-४०२ *(मालक:- श्री. राजेंद्र पित्रे.)*
*३)* रूम क्रमांक:-४०३ *(मालक:- श्री. आकाश पाटील.)*
*४)* रूम क्रमांक:-४०४ *(मालक:- श्री. महेंद्र मानकामे.)*
*५)* रूम क्रमांक:-४०५ *(मालक:- श्री. क्रांतीलाल विसरीया.)*
*६)* रूम क्रमांक:-४०६ *(मालक:- श्री अजय मुळे.)*

*सदर ओम कृष्णा को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी मध्ये एकूण अंदाजे ९० ते १०० व्यक्ती राहत होत्या.*

*सदर घटनास्थळी ओम कृष्णा को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी ही इमारत धोकादायक स्थितीत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्यामार्फत धोकापट्टी लावण्यात आली असून पुढील कार्यवाही बांधकाम विभाग व अतिक्रमण विभाग यांच्याकडून करण्यात येणार आहे.*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे