0
2
0
9
7
4
रामदास आठवले यांच्या वाहनाचा अपघात
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात झाल्याचे वृत्त समोर येत आहे. आठवले यांच्या वाहनाला कंटेनरने धडक दिली. साताऱ्यातील वाईजवळ ही घटना घडल्याचे समजते. या अपघातात रामदास आठवले यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने रामदास आठवले या अपघातातून सुखरुप बचावले आहेत.
0
2
0
9
7
4



