Breaking
नोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यात साईराज इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घराला इलेक्ट्रिक बोर्डमुळे लागली आग…

अमित जाधव - संपादक

0 2 5 4 1 7

आज दिनांक २०/०४/२०२६ रोजी १७:१६ वाजताच्या प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार (घटनेची माहिती देणारे:- दिवा अग्निशमन केंद्र) गणराज कॉम्प्लेक्स बाजूला, दिवा शीळ रोड, दिवा, ठाणे. या ठिकाणी *साईराज अपार्टमेंट (तळ + ०४ मजली) च्या पहिल्या मजल्यावरील रूम नं. १०२ मध्ये इलेक्ट्रिक स्विच बोर्डला आग लागली होती सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहन व ०१- रेस्क्यू वाहनासह तसेच टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.

सदर घटनास्थळी आग लागल्याने रूमधील इलेक्ट्रिक वायरिंग व सिलिंग फॅन जळून नुकसान झाले आहे.
सदर घटनास्थळी लागलेली आग स्थानिकांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांकडून १८:०५ वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 5 4 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे