कोपर आणि दिव्याच्या दरम्यान लोकल ट्रेन मधून तरुणीचा तोल जाऊन मृत्यू..
दिवा स्टेशन परिसरात सकाळच्या वेळेस प्रवाशांमध्ये लोकल पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना अनेक मृत्यूच्या घटना समोर येत आहे
अशीच घटना आज कोपर ते दिवा दरम्यान घडली असून रेल्वे ने प्रवास करणाऱ्या तरुणीला अखेर जीव गमवावा लागला आहे .
रिया श्यामजी रजगोर असे मृत तरुणीचे नाव असून तिचे वय अंदाजे २६ वर्ष ,ठाण्याला जाण्यासाठी तिने डोंबिवली येथून लोकल पकडुन दारात उभी राहिली असता लोकल सुरू झाली असता दिवा रेल्वे स्थानक हाकेच्या अंतरावर असताना रिया तोल जाऊन खाली पडली व जागीच मृत्यू झाला असे प्रथम दर्शी यांनी सागितलं.