
डोंबिवलीत तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रवीण पान्हेकर असे आरोपीचे नाव आहे. सरबतमध्ये गुंगीचे औषध देऊन आरोपीने मुलीवर अत्याचार केला, नंतर तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी देत पीडितेचा लैंगिक छळ केला. पीडिता गरोदर झाली, तेव्हा तिला कळाले की, आरोपीची दोन लग्न झाली आहेत. आता पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.