Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कवी लेखक छायाचित्रकार सुभाष जैन……

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

सुभाष शांताराम जैन परीचय

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कवी लेखक छायाचित्रकार सुभाष जैन
श्री सुभाष शांताराम जैन ठाण्यात १९८२ पासून सुभाष शांताराम जैन वास्तव्य करीत आहेत.दैनिक ठाणे वैभव, छायाचित्रकार, रिपोर्टर, सन १९९७पासून आतापर्यंत.. कार्यरत आहेत. आताची माझी जी थोडीफार ओळख आहे ती ठाणे वैभव या दैनिका मुळे आहे.माननीय संपादक मिलींद बल्लाळ साहेब,कार्यकारी संपादक निखिल बल्लाळ साहेब, ठाणे वैभव संपूर्ण टीमचे आभार.संपादक नितीन शिंदे साहेब तरूण आवाहन चे सुद्धा उत्तम सहकार्य मिळते.
मुंबई, ठाणे तसेच ठाणे जिल्ह्यातील दैनिकात बातमी फोटो जनतेच्या समस्या सुभाष जैन सतत देत असतात. आता पर्यंत अनेक बातम्यांच्या प्रभावामुळे त्यावर कार्यवाही झाली आहे. महाराष्ट्र टाइम्स मध्ये सिटीजन रिपोर्टर मध्ये असंख्य बातम्या छायाचित्रासह प्रकाशित झाल्या आहेत.
कवि, लेखक, समाज सेवक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे विद्यमान सल्लागार आहेत.माजी सल्लागार कामगार कल्याण केंद्र, वर्तक नगर, ठाणे .चंद्रावर स्वारी बाल काव्य संग्रह पुस्तक प्रकाशित. ३आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. चंद्रावर स्वारी बाल काव्य संग्रह पुस्तकास माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे कडून शुभेच्छा पत्र मिळाले. ( २७डिसेंबर २०१६), तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचेही शुभेच्छा पत्र प्राप्त झाले आहे.
नेत्रदान , देहदान  फॉर्म भरला आहे, चंद्रावर स्वारी बुकगंगाडॉटकॉम वर उपलब्ध आहे. अनेक पुरस्कार प्राप्त  ,मुंबई संध्या पुरस्कार, (पत्रकार भूषण पुरस्कार २०१८ पारस काव्यकला जनजागृती संस्था),महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाचा महाराष्ट्र दीप पुरस्कार,मुंबई व्रुत्तपत्र लेखक संघाचा भाई तांबे स्म्रुती पुरस्कार,१३ व्याअ.भा.जैन साहित्य संमेलनातधर्मानुरागी पुरस्कार सन्मान, शिवक्रांती सामाजिक संस्था तर्फे आदर्श समाज मित्र पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आता त्यांचे ६६ पुर्ण झाले आहे. २२फेब्रुवारी रोजी ते ६७ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
अनेक संस्थांचे लाईफमेंबर,पदाधिकारी, आजिव सभासद ते आहेत.
दुनिया मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष अनेक वर्षे चित्रकला स्पर्धेचे आयोजन. फोटो सर्कल सोसायटी, लाईफ मेंबर, महाराष्ट्र पत्रकार संघ ठाणे शहर उपाध्यक्ष.पुरोगामी पत्रकार संघ.ठाणे शहर उपाध्यक्ष, दधीचि देहदान मंडळ आजिव सभासद, मराठी विज्ञान परिषद, लाईफ मेंबर, मराठी विज्ञान परिषद (रजिस्टर) निलपुष्प साहित्य मंडळ ,दै.चौफेर संघर्ष वार्ताहर,सा. ठाणे नागरिक वार्ताहर , प्रसिद्धी प्रमुख
ठा. जि. वृ. ले. संघ रजिस्ट्रर, काव्य किरण कार्य कारीणी सदस्य,निलपुषप कार्यकारिणी सदस्य, मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे आजिव सभासद,

सामाजिक समस्यांना दै. ठाणे वैभव, दै. महाराष्ट्र टाईम्स, दैनिक जनादेश, दैनिक जनमत,दै. वृत्त मानस, दै. नवभारत टाईम्स, दै. लोकसत्ता, दै. लोकमत, दै. चौफेर संघर्ष, दै. सामना, दै. सकाळ, दै. नवशक्ति, सा. अचूकवार्ता, भालचंद्र मासिक, दर्याचा राजा, अनेक दिवाळी संपादक माननीय श्री सतिश भावे ठाणे नागरिक अंक , संपादक सत्यवान तेटांबे साहेब, साहित्याचार्य पंढरीनाथ तामोरे दर्याचा राजा इ. मधुन फोटो, बातम्या, पत्र, लेख,
कविता,बालकविता, बालकथा प्रकाशित झालेल्या आहेत.ईगल न्यूज पोर्टल,अक्षर मंच न्युज पोर्टल.पोलीस मित्र न्यूज पोर्टल, बेधडक ठाणे न्युज पोर्टल,वर प्रतिलिपि मध्ये अनेक कविता, कथा, लेख, साहित्य प्रकाशित झाले आहे.
मी मेल्यावर, स्त्रीभ्रूणहत्या रोखू या, मोबाईलची जादू इ कविता लोकप्रिय,  चंद्रावर स्वारी बालकविता लोकप्रिय महाराष्ट्र टाइम्स मध्ये टॉप वर अनेक ठिकाणचे श्री गणेश देवतेचे फोटो प्रकाशित. सिटीझन रिपोर्टर मध्ये अनेक बातम्या, फोटो प्रकाशित झाल्यावर त्यावर कार्यवाही झाली आहे. छंद :सार्वजनिक समस्याना वर्तमान पत्रा द्वारे प्रसिद्धी देणे, वर्तमान पत्रात फोटो बातमी प्रकाशित होण्यामुळे त्यावर त्वरित कारवाई होते.  फोटोग्राफी, वाचन, लिखाण, कविता करणे. समाज सेवा हिच ईश्वर सेवा असे ते मानतात. नेत्रदान देहादान फॉर्म भरला आहे. दधीचि देहदान मंडळाचे ते आजिव सभासद आहेत. नेत्रदान देहादान वर लेख प्रकाशित झाले आहेत. ठाणे जिल्हा वृत्त पत्र लेखक संघ रजिस्टर मध्ये अनेक वेळा दिवाळी अंक स्पर्धा मध्ये स्मृति चिन्हसाठी प्रायोजक बनून सहकार्य केले. आपण सर्व भारतीयांनी  एक मेकांना भेटतांना प्रथम जय हिंद बोलावे मग जय राम, जय भिम, जय जीनेंद्र, सलाम आदाब, Good Morning, सत श्री…, बोलावे. असे बोलल्याने ती व्यक्ति त्या धर्माची होत नाही की तिचा धर्म बदलत नाही. सगळे धर्म चांगलीच शिकवण देतात कोणताही धर्म वाईट शिकवत नाही. आतंकवाद्यां नो शस्त्र त्यागा जगात शांती नांदू द्या. जय हिंद. जय भारत
–एक शुभ चिंतक *

5/5 - (1 vote)

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे