गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
वाडा नगर पंचायती च्या अनागोंदी कारभारामुळे काँग्रेस उपोषणावर..
अमित जाधव-संपादक
0
2
0
9
7
4
*वाडा नगर पंचायती च्या अनागोंदी कारभारामुळे काँग्रेस उपोषणावर*
१५ दिवसापूर्वी वाडा नगरपंचायती ला लेखी तक्रार देवून ही काँग्रेस भवन वाडा सभोवताल चे अतिक्रमण न हटवल्याने पालघर जिल्हा काँग्रेस चे वरिष्ठ उपाध्यक्ष मोईज शेख हे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत वाडा नगर पंचायती च्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत.
वर्षानवर्षं असलेले भर बाजारातील सर्वच अतिक्रमणे हटविण्यात वाडा नगर पंचायत सपशेल अयशस्वी ठरली आहे. लेखी आगावू सूचना देऊनही,कोणीही एका अधिकाऱ्याने साधी नोंदही न घेतल्याने, उर्मट अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी व काँग्रेस भवनांचे हे अतिक्रमण हटवण्यासाठी आपण आपल्या कार्यकर्त्यांसोबत हे पाऊल उचलले असे शेख यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले. सदर उपोषणाची कल्पना आपण जिल्हाधिकारी, तसेच पोलिस अधीक्षक पालघर याना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
0
2
0
9
7
4


