छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या शुभ मुहूर्तावर आज डोंबिवलीतील घारडा सर्कल येथे छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण…
अमित जाधव - संपादक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनाच्या शुभ मुहूर्तावर आज डोंबिवलीतील घारडा सर्कल येथे छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. खासदार मा.श्री.डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या विशेष प्रयत्नांमुळे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याचे लोकार्पण शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे हस्ते करण्यात आले.
डोंबिवलीच्या प्रवेशद्वारावर आज शिवरायांचा पुतळा दिमाखात उभा राहिला आहे, ही तमाम डोंबिवलीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. आजपासून घरडा सर्कल हे ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ या नावाने ओळखल जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केले. तसेच शिवरायांचा हा पुतळा तरुण पिढीला महाराजांचा इतिहास आणि शौर्याची साक्ष देणारा ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ढोल ताशांच्या गजरात, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या साथीने रंगलेला हा सुवर्ण क्षणांचा सोहळा आज डोंबिवलीकरांना अनुभवता आला.
याप्रसंगी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, हिंदुराष्ट्र सेनाप्रमुख धनंजय देसाई, समाज प्रबोधनकार ह.भ.प. संग्राम बापू भंडारे महाराज, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच राजेश गोवर्धन मोरे कल्याण ग्रामीण विधानसभा डोंबिवली शहर प्रमुख यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले व रात्री उशिरा पर्यन्त कार्यक्रमांची रेलचेल सुरु होती