
कल्याण तालुक्यातील कांबा परिसरात दगडाच्या खाणीत काम करताना दोन कामागरांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. वीज पडून या कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती टिटवाळा पोलिसांनी दिली आहे. राजन यादव (वय 22) आणि बंदणा मुंडा (वय 25) अशी मृत कामगारांची नावं आहेत. याचा अधिक तपास टिटवाळा पोलिस करीत आहेत.असे यावेळी कळविण्यात आले आहे