Breaking
ब्रेकिंग

चांद्रयान ३ : जय हो! चांद्रयान 3 सह भारताच्या महत्वाकांक्षा अवकाशात झेपावल्या; पाहा…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

चांद्रयान 2 ला आलेल्या अपयशानंतर अखेर तब्बल 4 वर्षांनी इस्त्रोनं शास्त्रज्ञांच्या प्रचंड मेहनतीच्या बळावर चांद्रयान 3 मोहिम हाती घेतली. अनेक महिन्यांची मेहनत आणि आव्हानं पेलत इस्त्रोच्या चांद्रयान 3 उड्डाणाचा दिवस उजाडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून जागतिक स्तरावरील अनेक विद्वान आणि अभ्यासकांनी या मोहिमेवर लक्ष केंद्रीत करत असतानाच अखेर शुक्रवार 14 जुलै 2023 ला Chandrayaan 3 भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी अवकाशात झेपावलं आणि या यानासह भारताच्या असंख्य महत्त्वाकांक्षाही झेपावल्या.

काय आहेत चांद्रयान 3 ची वैशिष्ट्ये?
चांद्रयानाच्या 26 तासांपूर्वीच त्याच्या उड्डाणासाठीचं Count Down सुरु करण्यात आलं. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन हे प्रक्षेपण पार पडलं. चांद्रयान 3 ची लाँचिंगची तयारी पूर्ण होताच या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची रंगीत तालीमही पूर्ण झालीय आणि रंगीत तालीम 100 टक्के यशस्वी ठरली होती.

हे चांद्रयान देशातल्या कोट्यवधी लोकांची आशा बनून निधड्या छातीनं श्रीहरीकोटात उभं होतं. त्याच्या लॉन्चिंगसाठी LVM-3-M4 रॉकेटचा वापर करण्यात आला. प्रवासाचं सांगावं तर, सुमारे 3 लाख 84 हजार किलोमीटरचा प्रवास करुन चांद्रयान-3 हे 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्रावर उतरणार आहे. चांद्रयान-3 मोहिम भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. चांद्रयान चंद्रावर उतरेल तेव्हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर ही किमया करणारा भारत जगातला चौथा देश ठरणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे