Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

पोलीस अधिकाऱ्याकडून लग्नाच्या आमिषाने २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार…..

0 2 0 9 7 4

 

🟠 *पोलीस अधिकाऱ्याकडून लग्नाच्या आमिषाने २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार….

*पुणे* – येथील पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २५ वर्षीय तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कोथरूड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक प्रवीण नागेश जरदे (रा. शांतीबन सोसायटी कोथरूड) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी कोथरूड परिसरातीलच एका २५ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. मे २०१८ पासून हा प्रकार सुरू होता.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, प्रवीण जरदे हे यापूर्वी कोथरूड पोलिस ठाण्यात नेमणुकीस होते. त्यावेळी त्याची ओळख ब्युटीशियन असलेल्या फिर्यादी तरुणीसोबत झाली होती. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता ‘मी पोलिस अधिकारी आहे, तुझे तुकडे तुकडे करून तुला संपवून टाकेल, कोणी माझे काही वाकडे करू शकत नाही, मी सर्व मॅनेज करेल’ असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी देत हाताने मारहाण केली. कोथरुड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे