Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

⭕️डोंबिवलीत स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना सांगितिक श्रद्धांजली…..

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*⭕️डोंबिवलीत स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना सांगितिक श्रद्धांजली.*

डोंबिवली, ता 27 फेब्रु ( संतोष पडवळ) : स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना सांगितिक श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम काल डोंबिवली पूर्वेच्या श्री गणेश मंदिराच्या लंबोदर हाॕल मध्ये संपन्न झाला. साप्ताहिक शब्द खड्ग आणि आर्यन प्रस्तुत आॕर्केस्ट्रा धून ने लतादिदींना सांगितिक श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाचे आयोजक प्रा.दिपक जाधव. आणि गायिका सौ. रेखा निकुंभ होत्या. संयोजक श्री. सुनिल बनसोडे आणि सौ. साईली बनसोडे हे होते. कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक फ्री प्रेस जर्नल इंग्रजी. दैनिक नवशक्ती. साप्ताहिक शब्द खड्ग तथा टिटवाळा न्यूज चॕनल होते. या प्रसंगी ज्येष्ठ गायिका सौ. रेखा निकुंभ यांनी लतादिदींची एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून वाहवा मिळवली.

प्रसंगी एसएनडिटी काॕलेज डोंबिवलीचे प्राचार्य डाॕ. अरूण अहिरराव यांनी त्यांच्या भारदस्त आवाजात वातावारण निर्मिती केली. प्रा. दिपक जाधव यांनी रेखा निकुंभ यांच्या सोबत गझल सादर केल्या. नवोदितां साठी अशा स्वरूपाचे गायनाचे कार्यक्रम शब्द खड्ग आणि आॕर्केस्ट्रा आर्यन धून च्या माध्यमातून सतत घेऊ येत असतात. प्रसंगी दुबई मध्ये मिसेस ब्यूटी काॕन्टेस्ट जिंकलेल्या दिप्ती पालन आणि फ्री प्रेस नवशक्तिचे श्री संतोष पडवळ यांचा विशेष सत्कार प्रा. दिपक जाधव यांनी केला. तर सौ. साईली बनसोडे यांनी सौ. रेखा निकुंभ आणि डाॕ. अरूण अहिरराव सरांचा सत्कार केला. सौ. रेखा निकुंभ यांनी प्रा. दिपक जाधव यांचा सत्कार केला.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाबूराव जाधव. रविकांत जाधव. पुंडलिक गोडे. नरेंद्र वैराळ. विजय फडणीस. रमेश गभाले. विनय डांगे. शिवाजी जाधव. नरेन चव्हाण. रूपाली टावरे. अनिल चौगुले आणि मंदार गायधनी यांनी विशेष सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे