
स्टेशनमध्येच महिला पोलिसांवर ब्लेडने हल्ला
उल्हासनगरमध्ये महिला पोलिसांवर ब्लेडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस ठाण्यातच महिला पोलिसांवर ब्लेडने हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. जखमी महिला पोलीस शितल बामळेंवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाबासाहेब सोनवणे असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पण या आरोपीने पोलिसांवर हल्ला का केला याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही