खेड तालुका रत्नागिरी जिल्हा रहिवासी सेवा संस्था दिवा यांच्या 20वा वर्धापन दिनानिमित्त गुणगौरव व पुस्तक प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा…
अमित जाधव - संपादक
ठाणे शहरातील दिवा या शहरात वीस वर्षापासून खेड तालुका जिल्हा रत्नागिरी रहिवासी सेवा संस्था ,दिवा यांच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी विसावा वर्धापन दिन साजरा करत असताना विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच मार्गदर्शन व पुस्तक प्रकाशन सोहळा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन प्राध्यापक भरत जाधव सर राष्ट्रीय अध्यक्ष :दिव्यांग हुमान राईट फेडरेशन यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी माननीय माजी नगरसेवक अशोक पाटील साहेब तसेच माननीय विजय भोईर साहेब,नवनित पाटील, संगीता ताई भोईर ,रवींद्र देसाई, कांबळे साहेब ,रमेश पाटील, चंद्रकांत पाटील, अनिरुद्ध तिवारी ,विकास पवार, सचंद्र शर्मा इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून पुस्तक प्रकाशन करण्यात आले .तसेच प्राध्यापिका उज्वला जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना इ.दहावी आणि बारावी या वर्गानंतर आपले भविष्य उज्वल करण्यासाठी मेहनत ,जिद्द, नियोजन आणि विविध कोर्स याबद्दल सखोल माहिती दिली .त्याचप्रमाणे प्राध्यापक भरत जाधव सर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना आपले खरे गुरु आपले आई-वडील असतात . त्याचप्रमाणे आपले शाळेतील शिक्षक हे तुमचे गुरु असतात. त्यामुळे तुमच्या भविष्यातील यशातील खरे श्रेय हे तुमच्या गुरूंना असते ,आपला महाराष्ट्र या कोकण भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड याच भूमीत आहे .संविधान भारताला देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच भूमीत घडले. बरेचसे कवी ,लेखक या कोकण निर्माण झाले म्हणून ह्या कोकणभूमीला वंदन करून आपण युपीएससी, एम पी एस सी अशा विविध स्पर्धेच्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करून अधिकारी बनले पाहिजे तसेच उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या मराठी मुलांनी कष्टाने पुढे गेले पाहिजे अशा प्रकारचे मार्गदर्शन जाधव सरांनी केले तसेच या कार्यक्रमाचे आयोजन खेड तालुका रत्नागिरी जिल्हा रहिवासी सेवा संस्थाचे माजी, अध्यक्ष श्री प्रकाश चव्हाण साहेब हे स्वतः लेखक असून निर्भया या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. वीस वर्षापासून या संस्थेत कार्यरत आहे .तसेच संस्थेचे अध्यक्ष विलास उत्तेकर, सचिव उमेश भानसे, खजिनदार संतोष जोशी व इतर सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. मोठ्या संख्येमध्ये विद्यार्थी पालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.