सीएनजी वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजपासून म्हणजे 7 मार्च ते 9 मार्चपर्यंत सीएनजी पंप बंद राहणार आहेत. अंबरनाथसह कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली परिसरातील महानगर गॅसचे सीएनजी पंप बंद राहणार आहेत. अंबरनाथ येथील सीएनजी पंपाच्या मुख्य गॅस वाहिकेच्या देखभाल, दुरुस्तीचे काम महानगर गॅसकडून हाती घेण्यात आले आहे. महानगर गॅसने याची माहिती दिली. ठाणे जिल्ह्यातील 22 सीएनजी पंपांवर गॅस मिळेल.