दिवा शहरातील गणेश नगर ट्रेसफार्मर लागत असलेला रस्ता पूर्ण बिकट अवस्थेत…….आर.पी.आय(आ) शीतल बनसोडे यांनी फोडली वाचा….
अमित जाधव-संपादक
दिवा शहरातील गणेश नगर ट्रेसफार्मर लागत असलेला रस्ता पूर्ण बिकट अवस्थेत…….आर.पी.आय(आ) शीतल बनसोडे यांनी फोडली वाचा….
ठाणे महापालिका हद्दीतील दिवा शहरात दिवा आगासन रोड वरील मुख्य रस्त्याला लागून असलेल्या गणेश नगर येथील ट्रेसफार्मर च्या लागत असलेला कच्चा रस्ता पूर्ण पणे बिकट अवस्थेमध्ये असून रस्त्यावर अद्याप पर्यंत पथदिवे सुद्धा नाहीत नागरिकांना चालताना खूप मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते.रात्री च्या वेळी रस्ता पूर्ण अंधारात जात असून चोरी सारख्या इत्तर मोठ्या घटना घडू शकतात असे आर.पी.आय(आठवले गट)महिला आघाडी च्या महाराष्ट्र् -उप आद्यक्षा शीतल ताई बनसोडे यांनी स्पष्ट केलं.पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की आज जवळ जवळ येथील लोकप्रतिनिधींना ,नगरसेवकाना वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा रस्त्याकडे पाठ फिरवण्यात आली.सदर विभागात सात ते आठ हजार लोकसंख्या असून ह्याच रस्त्याचा एकमेव पर्याय येथील नागरिकांना चालण्यासाठी आहे अनेक जैष्ट बांधव,महिला वर्ग यांना येजा करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करीत आहेत.पावसाळ्यात रस्ता पूर्णपणे पाण्याखाली जाऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.मनसेचे एकमेव आमदार यांच्या कडे देखील रस्त्याच्या समस्येसाठी विनवणी केली असता अद्याप दुर्लक्षित करण्यात आले.समस्त रहिवासीयांनी आता अशाच यातना भोगाव्यात का?असे शीतल बनसोडे यांनी ठाणे महापालिका प्रशासनावर,लोकप्रतिनिधींवर येथील नगरसेवकांवर स्थानिकांच्या माध्यमातून त्रिव शब्दात नाराजी व्यक्त करत जर येत्या काही दिवसात रस्त्याची दुरवस्था सुधारण्यात आली नाही तर याचे पडसाद लवकरच उमटले जातील असे त्यांनी सोशल मीडियाच्या मध्यमातून इशारा दिला आहे तसेच सोबत दिवा शहरातील आर.पी.आय. चे असंख्य पद्धधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


