दिवा डंपिंग विरोधात बाळासाहेबांच्या शिवसेनेचं सडेतोड प्रत्युत्तर,. होय ! आम्ही तुमचं पितळ उघडं पाडलंय “तुम्ही नौटंकीबाजचं”
अमित जाधव - संपादक
होय ! आम्ही तुमचं पितळ उघडं पाडलंय*
“तुम्ही नौटंकीबाजचं”
👉डंपिंग बंद करण्याचा निर्णय झाला असताना डम्पिंग बंद करावे यासाठी आंदोलन करणारे
तुम्ही नौटंकीबाजचं
👉सन्मानीय *मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे* यांनी दिवावसीयांना दिलेल्या शब्दांनुसार दिव्यातील डम्पिंग बंद होऊन भंडार्ली येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महापालिका काम सुद्धा करत आहे. असे असताना त्याच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्याचे सोडून डम्पिंग बंद करावी असा आंदोलन करणारे *तुम्ही नौटंकीबाजचं*
👉भंडार्ली येथे घनकचरा प्रकल्प सुरू झाला तर दिव्याची डम्पिंग कायमस्वरूपी बंद होईल हे माहीत असताना सुद्धा भंडार्ली येथे घनकचरा प्रकल्प होऊ नये यासाठी दिव्यातील काही भाजपच्या नेत्यांनी, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना भेटून भंडार्ली प्रकल्पाला विरोध दर्शवला. असे दुतोंडी आणि ढोंगी लोकं *तुम्ही नौटंकीबाजचं*
👉डम्पिंग सुरू आहे म्हणून आकांड-तांडव करणारे तुम्ही, या दिवाहद्दीत डंपिंग कोणत्या साली सुरू झाली? कोणत्या पक्षाचा नगरसेवक असताना सुरू झाली? हे न सांगता, हे सत्य न मांडता दिवेकरांची दिशाभूल करणारे *तुम्ही नौटंकीबाजचं*
👉सन २००१ साली दिवा शहरात भाजपची नगरसेविका असताना दिवा हद्दीत सर्वप्रथम डम्पिंग सुरू झाली, ही गोष्ट दिवेकारांपासून लपवून आंदोलन करणारे *तुम्ही नौटंकीबाजचं*
👉सद्यस्थितीत ज्या विभागात डम्पिंग सुरू आहे तिथे काही पैशांसाठी, डम्पिंग साठी स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध करून देऊन दिवेकरांच्या आरोग्याशी खेळणारे *तुम्ही नौटंकीबाजचं*
जय हिंद ! जय महाराष्ट्र!