काँग्रेसच्या अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेडच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी प्रतिष्ठित वकील आत्माराम दवणे यांची नियुक्ती…
अमित जाधव - संपादक

ठाणे ता १३ जुलै : अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र राज्यासाठी ठाणे शहरातील अॅड. आत्माराम त्र्यंबकराव दवणे यांची महाराष्ट्र राज्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष राम अवतार अग्रवाल यांच्या स्वाक्षरीने दिनांक ११ जुलै २०२५ रोजी करण्यात आली आहे. हा कार्यभार सन्मानपूर्वक सेवा म्हणून पार पाडण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सदर नियुक्तीद्वारे अॅड. आत्माराम त्र्यंबकराव दवणे महाराष्ट्रात संघटनेचे कार्य संपूर्ण राज्यामध्ये करतील तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे विचार व धोरणे प्रभावीपणे अंमलात आणतील असे अग्रवाल यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे मा. नाना पटोले आणि मा. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची धोरणं प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जाईल. अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेस या माध्यमातून सामाजिक ऐक्य, प्रगतीशील विचारसरणी आणि लोकशाही मूल्यांचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ठाणे शहरातील दवणे यांच सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.